तुझ्यात जीव गुंतला, अन श्वास माझा.. माझा न राहिला
तुझ्यासवे अन तुझ्याविना, चहूकडे हवेत.. गंध तुझाच भारला
असताना तू सभोवती, नसताना तू सामोरी..
सतत ठाव घेण्या तुझ्या नजरेचा.. ध्यास मज लागला
घटकेत खुले माझी कळी, घटक्यात खोल डोहाच्या तळाशी
असे चंचल मन माझे.. स्थिर काही राहेना
होऊन आई चिंता करी, करी खडसावणी सखीच्या नात्याने, कधी रुसे मी होऊन मुलगी
कधी बरसावे प्रियेसम.. परंतु अंतर देण्या तुज.. मन माझे मानेना
विरह तुझा सोसवत नाही.. नाही पेलवत उष्ण जड श्वास, वाटते आता असे कि..
व्हावे तुझ्याशी एकरूप, तुझे सगे माझे सोयरे एकमेकांचे व्हावेत
तुझ्या काटेरी वाटेवर माझ्या प्रेमाची पुष्पे असावीत.. एक काळ एक विश्व तुझे नि माझे असावे
तुझ्या प्रेमाच्या बाहुपाशात सदैव मीच असावे
कल्पनेत ह्या माझा प्रत्येक क्षण चालला..
तुझ्यात जीव गुंतला, अन श्वास माझा.. माझा न राहिला
No comments:
Post a Comment