Sunday, March 20, 2011

आयुष्य!!!!

आयुष्य खूप सुंदर आहे, पाहता आलं पाहिजे,सारं आभाळ आपलंच आहे, उडता आलं पाहिजे,ध्येय नजरेच्या टप्प्यातच आहे, शोधता आलं पाहिजे,प्रेम करणं सोपं आहे, फक्त करता आलं पाहिजे......

Friday, March 18, 2011

धाकले महाराज!!!!!!!

काय बोलावे, आज आपलं रक्त उसळतं, अंग तापतं धाकल्या महाराजांच्या गोष्टी ऐकून,,,,, पण कोणाला आठवतं कि त्यांच्या हत्येनंतर साधा अग्नी देण्यासाठी सुद्धा मराठी पुरुषाचे हात-पाय कापत होते....शिवाजी महाराजांनंतर ८ वर्षात एकही गड-किल्ला काबीज करता नाही आला मुगलांना..मासाहेबांच्या छत्राखाली वाढलेल्या ह्यांना पत्नीच्या रुपात त्यांना साक्षात लक्ष्मीच प्राप्त झाली होती.... संभाजी राजांना कैद करणं हे केवळ धोक्यानेच शक्य होतं... रणांगणात औरंगजेबाला ते कधीच शक्य नव्हतं... अशा या राजाला लवून मुजरा!!!!!!!!!!

LIFE ...!!!

LIFE is so UN-certain.....when u r celebrating new phase in ur life n
just about to complete Ur dreamed picture,,,,somebody comes n mess it out very easily...
n this happens so very often....n still it hurts u every time as if this is only 1st "WOUND"

मराठी....

मराठी माझी भाषा, मराठी माझा बाणा,
मराठी माझे संस्कार,  मराठी माझा प्राण,
वळवावी तशी वळते मराठी, वाटे जे मनी ते व्यक्त करते मराठी,
एखाद्याचं कौतुक करते मराठी तसंच एखाद्याचा माज सुद्धा उतरवते मराठी,
अभिमान आहे मला मी मराठी असल्याचा आणि मराठी अस्मितेचा............

Thursday, March 17, 2011

नातं तुझं नि माझं...बिन नावाचं...नातं आपलं....!!!!!!!!

मन माझे आहे चंचल असं म्हणतोस तू
कारण क्षणात तुझ्यावरचा रुसवा दुरावतो मला
तुझा ते गोड हसू पाहताच गुदगुल्या करीत सांगतो मला
माझा रुसवा, कि जातो नं मी.... आता आला आहेस तू


जग खूप मोठं आहे पण माझ्याकरता माझं विश्व म्हणजे
तुझे ते निर्मळ डोळे आणि त्यातले ते सच्चे भाव
तुझी कुशी हीच माझी ब्रम्हानंदाची कल्पना अन
अन तुला पाहणं हाच माझ्या जगण्याला मिळालेला वाव


सोबत नसताना कुढणं अनुभवतात सगळेच जण
एकत्र असताना मिळणारा आनंद किती जण लक्षात ठेवतात
त्याहूनही नसताना असल्याची भावना कुणास येते हे..
हे जाणून घेण्यासाठी तुच यावा लागतोस आयुष्यात


तुझी ती मधुर वाणी, ते स्वच्छंदी हसू
उत्साही मन आणि मनमोकळा स्वभाव
याला न जाणो लागो कुणाची दृष्ट ह्या कल्पनेनेच येतात...
माझ्या डोळ्यात आसू


एखाद्या चौकटीत वर्तुळ अडकवायचं म्हटलं तर,
एकतर वर्तुळ तोडा नाहीतर चौकट मोडा
आणि ह्यापैकी काहीही करायचं नसेल तर मग जे उरतं ते असतं
नातं तुझं नि माझं...बिन नावाचं...नातं आपलं....!!!!!!!!