तुला ज्ञान दिलेलं आवडत
नाही हे मला माहित आहे.. पण चार समजुतीच्या गोष्टी सांगते.. ऐकल्यास तर तुझं आणि घरच्या सर्वांचे भले होईल..
सर्वात आधी कास्ट सर्टिफिकेट
करून मुलांचे शिक्षण मोफत होईल.. आदी आणि अनु सारखा आराध्याच्या वेळेस शिक्षणाचा प्रॉब्लेम होणार नाही..
कोणाही कडे पैसे मागू नकोस.. पैसे कमावण्याचा नैतिक पर्यायी मार्ग शोध.. लोकं तुझ्या बद्दल चांगले बोलत नाहीत ते पाहून खूप त्रास होतो जीवाला..
कुठे हि अडकणार नाहीस ह्याची काळजी घे .. प्रियाच्या अंगावर हात उचलू नकोस .. तिचे वागणे तुझ्या माझ्या प्रेम करण्याच्या चुकीमुळे झाले आहे ह्याची जाणीव नेहमी ठेव..
मी तुझ्या साठी कोण होते, कोण आहे आणि कोण असेन मला माहित नाही..
माझ्या मनात तुझ्या विषयी तिरस्कार कधी च नव्हता आणि नसेल हि.. आपण एकत्र नाही येऊ शकलो ह्याची खंत आयुष्यभर राहील ..
पण मला तुझ्यामधला बदल जाणवला.. मी नसताना मला वाटलं कि तू घरी येशील कि मी ३ आठवडे कामावर नाही आले .. एक फोन करशील असे वाटले होते.. पण तू नाही आलास किंवा तुझा फोन हि नाही आला.. Pride मध्ये तुझा expense भरायचे तो पासवर्ड बदलला होता मी सुट्टीवरून आले तेव्हा.. तेव्हा जाणवलं कि आता मला काही एक अधिकार नाहीये तुझ्या आयुष्यात.. आधी हि कदाचित नव्हता..
तुझ्या सोबत मी लहान मुलीसारखी बागडू शकले .. हट्टीपणा करू शकले .. ते मला कधी अभि सोबत करता नाही आले म्हणून कदाचित तुझ्या इतक्या जवळ आले मी.. जेव्हा दिलेस तेव्हा भरभरून प्रेम दिलेस.. त्याकरता धन्यवाद.. तुला मी कधी हि विसरू शकत नाही .. तुझे शब्द मी आयुष्यात कधीहि विसरणार नाही.. तुझी माझ्या कडे पाहणारी नजर हि मी कधी विसरू शकणार नाही .. तुझा आवाज मला नेहमी ऐकू येतो .. फक्त तुझी ऋतू म्हणून मारलेली हाक
कान आसुसलेले असतात..
असो.. माझे दुःख माझ्या पाशी .. जेव्हा केव्हा प्राण सोडेन ते तुझ्या च आठवणीत हे मात्र निश्चित..
.......