मन माझे आहे चंचल असं म्हणतोस तू
कारण क्षणात तुझ्यावरचा रुसवा दुरावतो मला
तुझा ते गोड हसू पाहताच गुदगुल्या करीत सांगतो मला
माझा रुसवा, कि जातो नं मी.... आता आला आहेस तू
जग खूप मोठं आहे पण माझ्याकरता माझं विश्व म्हणजे
तुझे ते निर्मळ डोळे आणि त्यातले ते सच्चे भाव
तुझी कुशी हीच माझी ब्रम्हानंदाची कल्पना अन
अन तुला पाहणं हाच माझ्या जगण्याला मिळालेला वाव
सोबत नसताना कुढणं अनुभवतात सगळेच जण
एकत्र असताना मिळणारा आनंद किती जण लक्षात ठेवतात
त्याहूनही नसताना असल्याची भावना कुणास येते हे..
हे जाणून घेण्यासाठी तुच यावा लागतोस आयुष्यात
तुझी ती मधुर वाणी, ते स्वच्छंदी हसू
उत्साही मन आणि मनमोकळा स्वभाव
याला न जाणो लागो कुणाची दृष्ट ह्या कल्पनेनेच येतात...
माझ्या डोळ्यात आसू
एखाद्या चौकटीत वर्तुळ अडकवायचं म्हटलं तर,
एकतर वर्तुळ तोडा नाहीतर चौकट मोडा
आणि ह्यापैकी काहीही करायचं नसेल तर मग जे उरतं ते असतं
नातं तुझं नि माझं...बिन नावाचं...नातं आपलं....!!!!!!!!

best!!!!
ReplyDelete