Wednesday, May 25, 2011

विश्वास........

     नदी.. स्वतःला झोकून देते सागराकडे... स्वतः गोड्या पाण्याची असूनही खारट पाण्यात समावण्यासाठी धावत असते...अखंड... तिला धरणाची भीती धाक दाखवून थांबवण्याचा व्यर्थ प्रयत्न करतो माणूस..पण तिची सागराबद्दलची ओढ तिला एका ठिकाणी थांबू देत नाही... वाहतं ठेवते सतत....
ती वाहत असताना कितीतरी जण तिच्यामध्ये आपली मलीनता स्वच्छ करून घेतात...पण म्हणून कधी ती मलीन होत नाही... आणि ती इतरांची मलीनता वाहून आणते म्हणून सागर हि तिला कधी नाकारत नाही...कारण तो हि तिच्या भेटी साठी तितकाच झुरत असतो... हे असतं खरा प्रेम... जे आपल्या जोडीदाराबद्दल आपल्याला वाटला पाहिजे... महत्वाचा असतो तो विश्वास... त्याशिवाय नातं कधी समोरच्याच्या मनात रुजतच नाही...
    आयुष्य खूप ओबड धोबड असतं.. तुम्ही विश्वासाने पाय टाकल आणि नेमका तिथे खड्डा असेल... आणि जेव्हा तुम्ही चाचपडत असता तेव्हा नेमका मार्ग साधा सरळ असतो..... पण ह्याच वेळी जुळतात ते धागे प्रेमाचे...मग ते प्रेमच सगळं काही असतं आपल्यासाठी...
त्या व्यक्तीसाठी जगात असताना आपण मी-पण  देखील विसरून जातो... पण म्हणतात न कि पुस्तक जास्त जवळ धरलं तरी वाचता येत नाही तसा होतं.. आपण खूप जवळ असतो त्याच्या आणि थोडीशी चूक होते त्याला समजून घेण्यात.... मग सुरु होतो तो गैरसमजाचा खेळ...ज्याचे परिणाम खूपच विचित्र असतात.. एखाद्या व्यक्तीला आयुष्य मानल्यावर त्या व्यक्तीशिवाय जगण्याची कल्पना देखील असह्य असते नाही... त्या व्यक्तीला केंद्रस्थानी मानून आपण आपला आयुष्य त्याच्या भोवती विणत जातो....
आणि अचानक केंद्राच्या पहिल्या साखळीची वीण उसवत जावी आणि सगळा आकारच नाहीसा व्हावा ह्यापरत मोठं दु:ख ते कोणतं??? 

पण ती साखळी सुटणार नाही ह्यासाठी द्यायचा असतो तो विश्वास... तो आयुष्यभर दोघांच्या नात्यांमधला दुवा बनून राहतो....
   
तुळस घरात आणून लावली म्हणजे आपला कर्तव्य संपलं असं होत नाही ना.. तिला खूप जपावी लागते... खत-पाणी करावं लागतं... तिला विश्वास द्यावा लागतो कि आपण आहोत तिच्या सोबत... सकाळ संध्याकाळ तिला पूजावं लागतं..... त्या बदल्यात ती तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतंच असते.. तिचा पावित्र्य मात्र आपल्याला सांभाळावं लागतं... आपली भाषा तिला कळते...शब्द कळत नसतीलही पण भाव मात्र नक्कीच कळतो... म्हणूनच संध्याकाळी कातरवेळी आपण जेव्हा थरथरत्या हाताने तुळशीपुढे दिवा लावतो ना तेव्हा मन कसं शांत होतं..

    विश्वास दिलात तर नक्कीच तुम्हाला पण विश्वास मिळेल... त्याही आधी स्वतःवर विश्वास असायला हवा.... आणि तो जर असेल तर कसलीच भीती नसते मनुष्याच्या मनात... सगळं काही आपोआप ठीक होत राहात... फक्त वेळ जायला हवा थोडा दोन जणांच्या एका नात्यामधून.. त्यांना एकमेकांची स्वतःच्या आयुष्यातली जागा कळून येते.. ती जागा भरलेली हवी हि गरज कळून येते आणि मग सगळी गाडी सुरळीत चालत राहते..आयुष्यभरासाठी....

4 comments: