Sunday, May 29, 2011

आदत........

आजकल आदतसी हो गयी हैं अन्धेरोंकी, रोशनी से ज्यादा,
अब तो आंसूही बहते है, नदियों से ज्यादा,
सोचा न था के आप तोड़ दोगे अपना वादा,
इसलिए हम मर रहें हैं जीने से ज्यादा...

दम तोड़ रहें हो आप,
साथ छोड़ रहे हो आप,
फिजा भी खिज़ा बनाने लगी हैं,
गुल भी झडने लगे हैं खिलने से ज्यादा...

धरती को सूरज जला रहा है,
अब तो आंसू भी पि रहा है,
हम तड़प रहें हैं प्यास से मगर,
बादल भी गरजते हैं बरसने से ज्यादा....

आज मला तुझी खूप आठवण येते......

आज मला तुझी खूप आठवण येते,
राहून राहून मन तुझीच वाट पाहते,
मनाला पक्के ठाऊक असते कि...
कि तू येणार नाहीस तरी पण...
तरी पण मन तुझी वाट पाहणे सोडतच नाही...


सर्वांमध्ये नसूनही मी सर्वांमध्ये असते,

पण सर्वजण
गेल्यावर मात्र मी कुठेच नसते,
मी कुठेच नसते..मी कुणाचीच नसते,
मी अगदी एकटी...अगदी एकटी असते....
आणि मग तुझी खूप आठवण येते,
राहून राहून मन तुझीच वाट पाहते...

संध्याकाळच्या गारव्याने अंगावर आलेला काटा
आठवतोय,
त्यावर झालेला तुझा स्पर्श आठवतोय,
गालावरचा तुझा उष्ण श्वासदेखील आठवतोय,
पण आता काहीच नाही.... ना काटा, ना स्पर्श, ना श्वास...
मग तुझा स्पर्श तुझा श्वास आठवतो,
आणि तुझी खूप आठवण येते,
राहून राहून मन तुझीच वाट पाहते...

अलगद पकडलेल्या हातातला आपलेपणा आठवतोय,

सहज म्हणून घेतलेल्या मिठीतला घट्टपणा आठवतोय,
तुझ्या मिठीतून पाहिलेला गुलमोहर आठवतोय,

तुझ्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण आठवतोय,
क्षणन क्षण आठवतोय..कणन कण आठवतोय,
तो कणन कण मला जपायचाय,
तू नसताना त्याची सोबत घेऊन तू असल्याचा आनंद मिळवायचाय,
तू आत्ता नाहीस ह्या विचारानेच मी असह्य होते,
आणि मग तुझी खूप आठवण येते,
राहून राहून मन तुझीच वाट पाहते,
मनाला पक्के ठाऊक असते कि...
कि तू येणार नाहीस तरी पण...
तरी पण मन तुझी वाट पाहणे सोडतच नाही...

Wednesday, May 25, 2011

विश्वास........

     नदी.. स्वतःला झोकून देते सागराकडे... स्वतः गोड्या पाण्याची असूनही खारट पाण्यात समावण्यासाठी धावत असते...अखंड... तिला धरणाची भीती धाक दाखवून थांबवण्याचा व्यर्थ प्रयत्न करतो माणूस..पण तिची सागराबद्दलची ओढ तिला एका ठिकाणी थांबू देत नाही... वाहतं ठेवते सतत....
ती वाहत असताना कितीतरी जण तिच्यामध्ये आपली मलीनता स्वच्छ करून घेतात...पण म्हणून कधी ती मलीन होत नाही... आणि ती इतरांची मलीनता वाहून आणते म्हणून सागर हि तिला कधी नाकारत नाही...कारण तो हि तिच्या भेटी साठी तितकाच झुरत असतो... हे असतं खरा प्रेम... जे आपल्या जोडीदाराबद्दल आपल्याला वाटला पाहिजे... महत्वाचा असतो तो विश्वास... त्याशिवाय नातं कधी समोरच्याच्या मनात रुजतच नाही...
    आयुष्य खूप ओबड धोबड असतं.. तुम्ही विश्वासाने पाय टाकल आणि नेमका तिथे खड्डा असेल... आणि जेव्हा तुम्ही चाचपडत असता तेव्हा नेमका मार्ग साधा सरळ असतो..... पण ह्याच वेळी जुळतात ते धागे प्रेमाचे...मग ते प्रेमच सगळं काही असतं आपल्यासाठी...
त्या व्यक्तीसाठी जगात असताना आपण मी-पण  देखील विसरून जातो... पण म्हणतात न कि पुस्तक जास्त जवळ धरलं तरी वाचता येत नाही तसा होतं.. आपण खूप जवळ असतो त्याच्या आणि थोडीशी चूक होते त्याला समजून घेण्यात.... मग सुरु होतो तो गैरसमजाचा खेळ...ज्याचे परिणाम खूपच विचित्र असतात.. एखाद्या व्यक्तीला आयुष्य मानल्यावर त्या व्यक्तीशिवाय जगण्याची कल्पना देखील असह्य असते नाही... त्या व्यक्तीला केंद्रस्थानी मानून आपण आपला आयुष्य त्याच्या भोवती विणत जातो....
आणि अचानक केंद्राच्या पहिल्या साखळीची वीण उसवत जावी आणि सगळा आकारच नाहीसा व्हावा ह्यापरत मोठं दु:ख ते कोणतं??? 

पण ती साखळी सुटणार नाही ह्यासाठी द्यायचा असतो तो विश्वास... तो आयुष्यभर दोघांच्या नात्यांमधला दुवा बनून राहतो....
   
तुळस घरात आणून लावली म्हणजे आपला कर्तव्य संपलं असं होत नाही ना.. तिला खूप जपावी लागते... खत-पाणी करावं लागतं... तिला विश्वास द्यावा लागतो कि आपण आहोत तिच्या सोबत... सकाळ संध्याकाळ तिला पूजावं लागतं..... त्या बदल्यात ती तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतंच असते.. तिचा पावित्र्य मात्र आपल्याला सांभाळावं लागतं... आपली भाषा तिला कळते...शब्द कळत नसतीलही पण भाव मात्र नक्कीच कळतो... म्हणूनच संध्याकाळी कातरवेळी आपण जेव्हा थरथरत्या हाताने तुळशीपुढे दिवा लावतो ना तेव्हा मन कसं शांत होतं..

    विश्वास दिलात तर नक्कीच तुम्हाला पण विश्वास मिळेल... त्याही आधी स्वतःवर विश्वास असायला हवा.... आणि तो जर असेल तर कसलीच भीती नसते मनुष्याच्या मनात... सगळं काही आपोआप ठीक होत राहात... फक्त वेळ जायला हवा थोडा दोन जणांच्या एका नात्यामधून.. त्यांना एकमेकांची स्वतःच्या आयुष्यातली जागा कळून येते.. ती जागा भरलेली हवी हि गरज कळून येते आणि मग सगळी गाडी सुरळीत चालत राहते..आयुष्यभरासाठी....

Monday, May 9, 2011

संजीवनी.......

आज तसा तिला उशीरच झाला होता ऑफिस मधून निघायला... आणि त्यात बस मिळत नव्हती...ट्राफिक मध्ये taxi पण थांबत नव्हती... अर्ध्या तासापासून ती बस ची वाट पाहत होती... आता तिला आई चा फोन आला.... "कुठे आहेस? निघालीस कि नाही अजून ऑफिस मधून??... प्रिशा, इतका उशीर नको ग करत जाउस...काळजी वाटते मला....",,,,,, हो ग आई.... पण काय करू सध्या कामच इतकं आहे कि मी नाही टाळू शकत.... असं म्हणून तिने फोन बंद केला.. तेव्हा तिला जाणवला कि कोणीतरी तिच्याकडे पाहत आहे... तिने त्या दिशेला पहिला तर वरद bike वर बसून तिच्याकडे पाहत होता... त्याला पाहून ती हसली आणि त्याच्या जवळ गेली... अगं तू कधीची निघाली आहेस ऑफिस मधून???? अजून इथेच??? त्याच्या ह्या प्रश्नांना तिने रोजचंच आहे हे ह्या आविर्भावात हसून उत्तर दिलं...
           वरद आणि प्रिशा एकाच कंपनी मध्ये जॉब करायचे....गेले २-३ महिने ते एकमेकांना थोडेफार ओळखत होते.... ऑफिस मध्ये कामानिमित्त बोलणं व्हायचं त्याव्यतिरिक्त gtalk हा त्यांच्यामधला दुसरा एक दुवा होता... काम करता करता एकमेकांशी बोलणं... कधी नजरानजर झालीच तर हसणं,,, हे सुरु असायचं.... ह्या आधीही मी तुला सोडू का bike ने स्टेशन पर्यंत हे नजरेने बऱ्याचदा विचारला होता प्रिशाला...आणि तिने हि नजरेनेच नकार दिला होता.... नकाराचा कारण तिचा तिलाही उमगला नव्हतं कधी पण कदाचित तिच्या भावना त्याच्यापर्यंत पोचू नयेत हाच उद्देश असावा.... कारण वरद तिला आवडायचा... त्याच्यातले निरनिराळे गुण तिला भावून जायचे.... पण हे तिने कधी तिने त्याला जाणवू दिला नव्हतं.... बहुदा हेच कारण होता तिने त्याचं सोबत न जाण्याचं....वरदलाही प्रिशा आवडायची...तिचा मनमोकळा स्वभाव...तिचं हसणं.. समजूतदारपणा...सगळी काही....
आज वरदने न राहवून प्रिशाला विचारलंच,,,, येतेस का माझ्या सोबत? सोडू का मी तुला स्टेशन पर्यंत? आणि


आणि आज चक्क प्रिशाहि हो म्हणाली...
 
          
क्रमशः

Saturday, April 23, 2011

तू न मी.......

नुसता वाहतच नाहीये वारा.....
तर मातीचा सुगंध माळतोय माझ्या वेणीत..
लाटा घेऊन जात आहेत किनाऱ्यावरून समुद्रात...
मी लिहिलेलं आपलं गुपित.....

सोबत पाहिलेला तो सूर्यास्त...
गुंफुनी तुझ्या हातात हात.....
रक्तिमा फाकलेलं ते आभाळ..
त्याला समुद्राची चंदेरी काळी साथ....

गजबजलेल्या किनाऱ्यावर एकमेकांच्या सहवासात..
एकमेकांच्या डोळ्यात पाहत जग विसरणारे..
तू न मी... का मी न तू... का आपण..????
एकमेकांशिवाय अपूर्ण असणारे......
 तू न मी........

Sunday, March 20, 2011

आयुष्य!!!!

आयुष्य खूप सुंदर आहे, पाहता आलं पाहिजे,सारं आभाळ आपलंच आहे, उडता आलं पाहिजे,ध्येय नजरेच्या टप्प्यातच आहे, शोधता आलं पाहिजे,प्रेम करणं सोपं आहे, फक्त करता आलं पाहिजे......

Friday, March 18, 2011

धाकले महाराज!!!!!!!

काय बोलावे, आज आपलं रक्त उसळतं, अंग तापतं धाकल्या महाराजांच्या गोष्टी ऐकून,,,,, पण कोणाला आठवतं कि त्यांच्या हत्येनंतर साधा अग्नी देण्यासाठी सुद्धा मराठी पुरुषाचे हात-पाय कापत होते....शिवाजी महाराजांनंतर ८ वर्षात एकही गड-किल्ला काबीज करता नाही आला मुगलांना..मासाहेबांच्या छत्राखाली वाढलेल्या ह्यांना पत्नीच्या रुपात त्यांना साक्षात लक्ष्मीच प्राप्त झाली होती.... संभाजी राजांना कैद करणं हे केवळ धोक्यानेच शक्य होतं... रणांगणात औरंगजेबाला ते कधीच शक्य नव्हतं... अशा या राजाला लवून मुजरा!!!!!!!!!!